Join us

अंगद बनला व्हिलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 15:19 IST

फालतू आणि उंगली यांसारख्या चित्रपटात काम केलेला अभिनेता अंगद बेदी २४ या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेत तो ...

फालतू आणि उंगली यांसारख्या चित्रपटात काम केलेला अभिनेता अंगद बेदी २४ या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेत तो एका नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. अंगद आफ्रिकेत राहाणारा रहिवाशी दाखवला असून एटीयु या संस्थेच्या संशयित यादीमध्ये तो आहे असे मालिकेत दाखवले जाणार आहे.अनिल कपूरसारख्या अभिनेत्यासोबत काम करायला मिळाल्याचा त्याला प्रचंड आनंद होत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला अनेक छटा असल्याने ही भूमिका साकारताना खूप मजा आली असे तो सांगतो. २४ या मालिकेच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या सिझनलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळावा अशी त्याची इच्छा आहे.