..आणि माझे अपहरण झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 16:46 IST
भाभी, कलश या मालिकांमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री डॉली सोही सध्या कलश - एक विश्वास या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत ...
..आणि माझे अपहरण झाले
भाभी, कलश या मालिकांमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री डॉली सोही सध्या कलश - एक विश्वास या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तिचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दिवशी डॉलीच्या बहिणीने तिचे सेटवरून अक्षरशः अपहरण केले होते. ती सांगते, "मी रात्री मालिकेच्या सेटवर चित्रीकरण करत होते. त्यावेळी माझे काही मित्रमैत्रिणी आणि माझी बहीण मालिकेच्या सेटवर आले. तिथून ते मला घेऊन गेले. माझी बहीण आणि माझी मैत्रीण प्रणाली घोगरे यांनी माझ्याासाठी सरप्राईज पार्टी आयोजित केली होती. आम्ही रात्रभर पार्टी केली. माझ्या मालिकेतील सहकलाकारही त्यावेळी उपस्थित होते. त्यामुळे माझा हा वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता."