Join us

... आणि इशिता रडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 17:52 IST

रिश्तो का सौदागर बाजीगर या मालिकेतील एका दृश्यात इशिता दत्ताला तिचा सहकलाकार वत्सल सेठच्या कानाखाली लगावायची होती. वत्सल इशिताला ...

रिश्तो का सौदागर बाजीगर या मालिकेतील एका दृश्यात इशिता दत्ताला तिचा सहकलाकार वत्सल सेठच्या कानाखाली लगावायची होती. वत्सल इशिताला सेटवर नेहमीच खूप सतवत असतो. त्यामुळे त्याला सतवण्याची खूप चांगली संधी आपल्या हातात आली आहे असा विचार करून इशिता कानाखाली मारण्यावरून त्याची चांगलीच टर उडवत होती. पण ज्यावेळी हे दृश्य चित्रीत करण्याची वेळ आली, त्यावेळी सेटवरचे वातावरणच बदलले. इशिता काहीही करून वत्सलच्या कानाखाली मारायला तयारच नव्हती. शेवटी हे केवळ एक दृश्य आहे आणि जोपर्यंत तू माझ्या जोरात कानाखाली लावणार नाही, तोपर्यंत हे दृश्य चांगले वाटणार नाही असे वत्सलने तिला समजावले. त्यानंतर तिने जोरात वत्सलच्या कानाखाली लगावली. पण वत्सलच्या कानाखाली लावल्यामुळे इशितालाच खूप वाईट वाटले. ती सेटवरच जोराजोराच रडायला लागली. शेवटी वत्सलने तिला जवळ घेऊन शांत केले. इशिताने या आधीही दृश्यात तिच्या सहकलाकाराच्या कानाखाली लगावली आहे. अशाप्रकारच्या दृश्यांचे चित्रीकरण करणे हे अतिशय कठीण असते. भविष्यात चित्रीकरणासाठी कोणालाची कानाखाली देण्याची माझी इच्छादेखील नाही असे इशिता सांगते.