'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas Serial) मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली ठसठशीत छाप पाडली असून, नातेसंबंधांची गुंतागुंत, पात्रांचा भावनिक प्रवास आणि प्रत्येकीची एक गोष्ट यामुळे ही महामालिका सातत्याने चर्चेत राहिली आहे. अलीकडील घडामोडींमुळे या प्रवासात आणखीच रंग भरले जाणार आहेत. घरातील पूर्वापार देवघरात असलेले शाळीग्राम विकले गेल्याबाबत खळबळजनक सत्य लक्ष्मीच्या समोर येत. संतोषने शाळीग्राम विकण्याचा प्रयत्न केला होता. या विश्वासघाताने हादरलेली लक्ष्मी ते शाळीग्राम परत घेते आणि श्रीनिवाससह घर सोडण्याचा निर्णय घेणार आहे.
दुसरीकडे, जान्हवीला तिच्या गरोदरपणाची बातमी कळते आणि नव्या बाळाच्या आगमनाने जयंतच्या वागणुकीत बदल होईल, अशी आशा ती मनात आहे. या सगळ्यात भावनाच राजकारणातील यश देखील लक्षवेधी ठरणार आहे. कारण ती आता पक्षाचा नवा चेहरा बनणार आहे. लक्ष्मी आणि शांता आज्जी आता जान्हवीच्या घरी राहत असून, तिला जयंतच्या जाचातून थोडा दिलासा मिळणार आहे. मात्र, त्या दोघींची उपस्थिती जयंतला अजून भडकवेल का, याची भीती जान्हवीला आहे. दरम्यान, जान्हवी पुन्हा ऑफिस जॉईन करत जयंतची पर्सनल मॅनेजर बनणार आहे. विश्वा सोबतची तिची जुनी मैत्री सुद्धा पुन्हा फुलू लागणार आहे.
दुसरीकडे संतोष आणि सिंचना यांच्यातले वाद विकोपाला जात असून, खर्चाची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने संतोष हरीशवर चिडतो. सिंचना मात्र हरीशला तिच्या वडिलांकडून पैसे घेऊन बिझनेस सुरू करण्याचा दबाव टाकते. रेणुका अजूनही आनंदीला स्वीकारायला तयार नाही. आनंदीला पुन्हा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा आग्रह ती धरते. या सर्व घडामोडी ‘लक्ष्मी निवास’च्या कथानकाला आकर्षक बनवत आहे. श्रीनिवास आणि लक्ष्मीचे टोकाचं पाऊल कुटुंबासाठी नवीन संकट असेल ? भावनाचं यश तिला कोणत्या नव्या जबाबदाऱ्या देईल? या सर्वांचं उत्तर जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल.