Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! मराठी अभिनेत्रीचा नवऱ्यासोबत स्विमिंगपूलमध्ये रोमान्स, हॉट व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:31 IST

मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी कपल असलेले अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभांकर तावडे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांची केमिस्ट्रीही चाहत्यांना प्रचंड आवडते. आतादेखील अमृताने नवऱ्यासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी कपल असलेले अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभांकर तावडे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांची केमिस्ट्रीही चाहत्यांना प्रचंड आवडते. एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ते प्रेम व्यक्त करताना दिसतात. आतादेखील अमृताने नवऱ्यासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती शुभांकरसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. स्विमिंगपूलमध्ये ते दोघही रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते आणि सेलिब्रिटींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमृताचा या व्हिडीओत हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. जे पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 


अमृता आणि शुभांकर दोघेही मराठी कलाविश्वात सक्रिय आहेत. 'प्रेमाची गोष्ट', 'श्री गुरुदेव दत्त', 'रंग माझा वेगळा', 'जय जय स्वामी समर्थ', 'कन्यादान' या मालिकांमध्ये अमृताने काम केलं. तर शुभांकरही लोकप्रिय अभिनेता आहे. 'धर्मवीर', 'चौक', 'सरसेनापती हंबीरराव', 'मंत्र' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. 'कन्यादान' या मालिकेत अमृता आणि शुभांकर यांनी एकत्र काम केलं होतं. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. २०२४ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली होती. आता त्यांच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress Amruta Bane's romantic pool video with husband goes viral.

Web Summary : Marathi actors Amruta Bane and Shubankar Tawde's romantic pool video is trending. The couple, known for their chemistry, shared the intimate moment on social media, drawing likes and comments. They met on set of 'Kanyadaan' and married in 2024.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता