Join us

किल्लासाठी अमृताला अ‍ॅवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 02:10 IST

        कलाकारांसाठी एखादा अ‍ॅवॉर्ड मिळणे म्हणजे त्यांच्या कामाचे कौतुक केल्याची पावतीच त्यांना मिळते. कलाकार हे पुरस्कारासाठी ...

        कलाकारांसाठी एखादा अ‍ॅवॉर्ड मिळणे म्हणजे त्यांच्या कामाचे कौतुक केल्याची पावतीच त्यांना मिळते. कलाकार हे पुरस्कारासाठी काम करीत नसले तरी चांगल्या कामाची दखल पुरस्कारांच्या माध्यमातून घेतली गेली तर त्या कलाकारांना पुढील काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ मोठे अ‍ॅवॉर्ड फंक्शन्स होत असतात. बेस्ट अ‍ॅक्टरच्या अ‍ॅवॉर्ड साठी तर चांगलीच तगडी कॉम्पिटीशन असते. मग अशातच आपल्या मराठमोळ््या कलाकारांनी बाजी मारली तर ती नक्कीच अभिमानास्पद गोष्ट ठरते.             अमृता सुभाषला नूकताच झी सिने अ‍ॅवॉर्ड बेस्ट अ‍ॅक्ट्रेस म्हणुन किल्ला साठी मिळाला. सीएनएक्सने तिच्याशी यासंदर्भात मुलाखत घेऊन तिच्या भावना जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. पुरस्कार मिळाल्याबद्दल अमृता एवढी खुष होती कि ति म्हणाली. मी एका कार्यक्रमासाठी पुण्यात होते त्यामुळे तो पुरस्कार मी माझ्या हाताने स्वीकारु शकले नाही याची मला नक्कीच खंत आहे . मी मेकअप रुममध्ये असताना माझ्या दिग्दर्शकाचा मला फोन आला कि तुला झी सिने अ‍ॅवॉर्ड मिळाला. मला इतका आनंद झाला कि ते शब्द ऐकुनच मी जोरात किंचाळले. असेच पुरस्कार अमृताला मिळावेत अशी आपण आशा करुया.