Join us

अमृताचा नवा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 00:17 IST

 पूर्वीच्या तुलनेत सध्या मराठी इंडस्ट्री ही ग्लॅमरस होत चालली आहे.कारण फक्त बॉलिवुड अ‍ॅवार्डस वगैरे काही असेल तर कोणती अभिनेत्री ...

 पूर्वीच्या तुलनेत सध्या मराठी इंडस्ट्री ही ग्लॅमरस होत चालली आहे.कारण फक्त बॉलिवुड अ‍ॅवार्डस वगैरे काही असेल तर कोणती अभिनेत्री काय परिधान करून येईल किवा तिची फॅशन स्टाईल काय असेल याची चर्चा खूप रंगत असतं.  पण, आता, या चर्चेमध्ये मराठी इंडस्ट्रीदेखील सहभागी झाल्याचे दिसते. सर्व तरूणांची आपल्या नृत्याने बारा वाजविणारी सुंदर अशी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने चक्क लूकच चेंज केलेला दिसतो. एका अ‍ॅवार्डप्रसंगी ती तिच्या हेअरकटमुळे आकर्षित होत होती. तिने परिधान केलेल्या पूर्ण रेड कलरचा प्लेन लॉग स्कर्ट व ब्लॉऊजमुळे ती एखादया बॉलिवुड कलाकार टक्कर देईन अशी सुरेख दिसत होती. म्हणूनच,तिच्या या लाल फॅशन स्टाइल व हेअरकटमुळे तिने सर्वाचे बारा वाजविले हे मात्र नक्की!