Join us

​अमृता पुरीची छोट्या पडद्यावर एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 11:02 IST

बॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक निखील अडवाणी लवकरच एक मालिका दिग्दर्शित करणार आहेत. प्रिसनर्स ऑफ वॉर असं या मालिकेचं नाव असेल. ...

बॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक निखील अडवाणी लवकरच एक मालिका दिग्दर्शित करणार आहेत. प्रिसनर्स ऑफ वॉर असं या मालिकेचं नाव असेल. अमेरिकन सिरीज होमलँड ज्या इस्त्रायली सिरीज ‘हातुफिम’वर आधारित होती त्याचं भारतीय वर्जन म्हणजे ही मालिका असेल. कारगिल युद्धाचा बॅकड्रॉप असलेल्या या मालिकेतून काय पो छे आणि आयेशा सिनेमाची अभिनेत्री अमृता पुरी छोट्या पडद्यावर एंट्री मारणार आहे. याशिवाय सत्यदीप मिश्रा, संध्या मृदुल, पूरब कोहली यांच्याही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका असतील. नोव्हेंबरमध्ये ही मालिका रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.