Join us

अमृता खानविलकरचे दिवाळी स्पेशल फोटोशूट व्हायरल, अभिनेत्रीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 09:00 IST

अमृताने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृता सध्या दिवाळी सणाचा आनंद लुटते आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अमृताने खास साडीत फोटोशूट केलं आहे.  लाल रंगाच्या साडीत अमृताच्या सौंदर्याला चार चांद लागले आहे. अमृताच्या आजूबाजूला लाईटिंग केलेली आहे. कॅप्शनच्या माध्यमातून अमृताने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी ही अमृताला कमेंट्सच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रेटींना दिवाळी पार्टी रद्द केली आहे. आपल्या कुटुंबासोबत कलाकार दिवाळी साजरी करणार आहेत. 

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.  

टॅग्स :अमृता खानविलकर