Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘२४’ मध्ये अमृता खानविलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 21:07 IST

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या ‘२४’ या मालिकेचा पहिला भाग तुफान गाजला. लवकरच याचा दुसरा सीझन येत आहे. त्यात मराठमोळी ...

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या ‘२४’ या मालिकेचा पहिला भाग तुफान गाजला. लवकरच याचा दुसरा सीझन येत आहे. त्यात मराठमोळी अमृता खानविलकर चमकणार असल्याचे समजते. ‘नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तुफानी कामगिरी करुन विजेतेपद पटकावल्यानंतर ग्लॅमडॉल अमृताला खूपच आॅफर्स आल्या. अनेक उत्तमोत्तम मराठी सिनेमांसोबत यात काही हिंदी प्रोजेक्टही होते.पैकी अमृताने बहुचर्चित ‘२४’ या मालिकेची आॅफर स्विकारली असल्याचे समतं. बॉलिवूडवाल्यांचे मराठी कलाकारांकडे बारकाईनं लक्ष असते. बॉलिवूडमध्ये अभिनयाची चमक दाखविल्यानंतर अमृताला एका रिअ‍ॅलिटी शोसाठी विचारणा झाली होती. या मालिकेत अमृता एका राजकीय नेत्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. अभिनय देव यांची निर्मिती असलेली ही मालिका अमेरिकेच्या ‘२४’ या मालिकेचे भारतीय रुपांतर आहे. मार्च मध्ये सुरू होणारी ही मालिका काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून ती जून किंवा जुलैमध्ये सुरू होणार आहे.