Join us

७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:28 IST

केबीसीचा पुढील सीझन ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorpati)चा १७ वा सीझन येत आहे. हा सीझनही अमिताभ बच्चनच (Amitabh Bachchan) होस्ट करणार आहेत. कित्येक वर्षांपासून ते या शोचा भाग आहेत. एकेकाळी अमिताभ बच्चन दिवाळखोर व्हायला आले होते. तेव्हा याच शोने त्यांन तारलं होतं. आता बिग बी नव्या सीझनमधील प्रत्येक एपिसोडसाठी किती रुपये घेणार माहितीये का?

केबीसीचा पुढील सीझन ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. स्पर्धकांच्या विजयावर 'सात करोड' असं म्हणणारे बिग बी स्वत: प्रत्येक एपिसोडसाठी तगडी रक्कम घेतात. मीडिया रिपोर्टनुसार, कौन बनेगा करोडपती १७ साठी बिग बी दर एपिसोडसाठी ५ कोटी रुपये घेणार आहेत. शोच्या मेकर्सने मात्र याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की सध्या सुरु असलेल्या 'CID 2'ला केबीसी रिप्लेस करणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून केबीसी हा शो सुरु आहे. ३ जुलै रोजी शोला २५ वर्ष पूर्ण झाली. याविषयी अमिताभ बच्चन भावना व्यक्त करत म्हणालेले की, "केबीसीच्या यंदाच्या सीझनची तयारी असताना मला कळलं की शोला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. ३ जुलै २००० रोजी केबीसीचा पहिला एपिसोड आला होता. २५ वर्ष, केबीसीचा हा प्रवास." 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन