Join us

 हर चीज को ब्रेक लग सकता है...सपनों को नहीं...!  या तारखेपासून सुरु होतेय KBC 12 चे रजिस्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 11:42 IST

हर चीज को ब्रेक लग सकता है...सपनों को नहीं’ अशी नव्या सीझनची टॅगलाइन आहे.

ठळक मुद्दे  रजिस्ट्रेशन  प्रक्रियेसह शो सुरु होण्यास 3 महिन्यांचा काळ लागतो. तोपर्यंत स्थिती सामान्य होईल, अशी आशा चॅनलला आहे.

टीव्हीवरचा सर्वात मोठा क्विज शोपैकी एक ‘कौन बनेगा करोडपती’चे 12 वे सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. होय, कोरोना व्हायरस शिवाय लॉकडाऊन असे सगळे असताना अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या 12 व्या सीझनची घोषणा केली आहे. येत्या 9 मे पासून या सीझनचे रजिस्टेशन  सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदा  रजिस्ट्रेशन ते स्पर्धकांची निवड ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यावेळी शोची टॅगलाइन सुद्धा नेहमीपेक्षा खूपच वेगळी आहे. प्रेक्षकांना लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या नकारात्मकतेमधून खंबीरपणे बाहेर पडण्याची प्रेरणा देते. ‘हर चीज को ब्रेक लग सकता है...सपनों को नहीं’ अशी नव्या सीझनची टॅगलाइन आहे.अमिताभ यांनी एक व्हिडीओ शेअर करून याची माहिती दिली आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी राहून हा व्हिडीओ शूट केला गेला आहे.

‘कौन बनेगा करोडपती 12’ चे रजिस्ट्रेशन येत्या 9 मे रोजी रात्री 9 वाजतापासून सुरु होईल.  यात अमिताभ बच्चन रोज रात्री 9 वाजता सोनी चॅनेलवर एक प्रश्न विचारतील. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला SMS  किंवा सोनी लिव या अ‍ॅपवरुन द्यायचे आहे. प्रश्नाचे अचूक उत्तर देणा-यांना यातून निवडले जाईल आणि त्यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्यात येईल. प्रोसेसच्या तिस-या टप्प्यात निवडलेल्या स्पर्धकांची एक सामान्य ज्ञानाची परिक्षा घेतली जाईल.  याचा व्हिडीओ बनवून स्पर्धकांना तो सोनी लिव अ‍ॅपवरुन पाठवायचा आहे. त्यानंतर या स्पर्धकांची व्हिडीओ कॉलिंगद्वारे मुलाखत घेतली जाईल.  रजिस्ट्रेशन  प्रक्रियेसह शो सुरु होण्यास 3 महिन्यांचा काळ लागतो. तोपर्यंत स्थिती सामान्य होईल, अशी आशा चॅनलला आहे. केबीसीचे ऑडिशन चार भागांत होते. पहिल्या भागात रजिस्ट्रेशन, मग स्क्रिनिंग, ऑनलाईन ऑडिशन व पर्सनल इंटरव्ह्यू असे हे चार टप्पे असतात. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन