Join us
Daily Top 2Weekly Top 5

Amazing या अभिनेत्रीने केलेल्या योगाला तोडच नाही, वयाच्या चाळीशी ओलांडल्यानंतरही आहे इतकी फिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 07:15 IST

तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले होतात. सोशल मीडियावर तिचा 6 लाखांहून अधिक चाहता वर्ग आहे.

सुंदर आणि फीट दिसणं यासाठी टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक खूप मेहनत घेते . ती दिवसाची सुरुवात योगा ने करते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी  सूर्य नमस्कार करते. ती नियमितपणे आष्ठांग योगही करते. तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले होतात. सोशल मीडियावर तिचा 6 लाखांहून अधिक चाहता वर्ग आहे.

 नियमित योगा करण्याबद्दल कविता सांगते,नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो."

लग्नानंतर अनेकांनी कविताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले होते. त्यावेळी कविताने मोठा खुलासा केला होता. कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते. मी माझ्या मुलावर कुठलाही अन्याय करू इच्छित नाही. 40 व्या वर्षी मी आई होणार असेल तर माझा मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत मी वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असेन. केवळ 20 व्या वर्षी माझ्या मुलावर त्याच्या म्हाता-या आई - वडिलांची जबाबदारी यावी हे मला नको आहे असे कविताने सांगितले होते.

टॅग्स :कविता कौशिक