Join us

ऑन स्क्रीन बहिणीसह अमनचं लवकरच शुभमंगल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:20 IST

होस्ट आणि अभिनेता अमन वर्मा लवकरच रेशीमगाठीत अडकणार आहे.. छोट्या पडद्यावरील 'शपथ' या मालिकेत अमनच्या बहिणीची भूमिका साकारणा-या वंदना लालवाणीसह ...

होस्ट आणि अभिनेता अमन वर्मा लवकरच रेशीमगाठीत अडकणार आहे.. छोट्या पडद्यावरील 'शपथ' या मालिकेत अमनच्या बहिणीची भूमिका साकारणा-या वंदना लालवाणीसह त्याचं शुभमंगल पार पडणार आहे.. गेल्या काही दिवसांपासून अमन आणि वंदना यांचं अफेअर सुरु होतं.20 एप्रिलला त्यांचं लग्नही होणार होतं.. मात्र काही कारणास्तव हे लग्न पुढं ढकलण्यात आलं..त्यामुळं दोघांच्या नात्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.. अखेर वंदनाशी असलेल्या नात्यात कोणतीही कटूता आली नसल्याचं खुद्द अमननं स्पष्ट केलंयइतकंच नाही तर लवकरच रेशीमगाठीत अडकणार असल्याची गुड न्यूज त्यानं फॅन्सना दिलीय.