Join us

ऑल इज वेल – भारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 16:49 IST

सगळ्यांना पोट धरुन हसायला लावणारी कॉमेडियन भारती आता एकदम ठणठणीत आहे. ऑल इज वेल असा संदेश भारतीनं आपल्या फॅन्स ...

सगळ्यांना पोट धरुन हसायला लावणारी कॉमेडियन भारती आता एकदम ठणठणीत आहे. ऑल इज वेल असा संदेश भारतीनं आपल्या फॅन्स आणि हितचिंतकांना दिलाय. दोन दिवसांपूर्वी कामाच्या अतिताणामुळं भारतीला अचानक अस्वस्थ जाणवू लागलं होतं. तिला तात्काळ मुंबईच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. मात्र भारतीला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर भारतीनं आपल्या फॅन्सचे आभार मानलेत. कफ आणि अतिकामाचा ताण आल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता सगळं काही ठीक असल्याचं तिनं सोशल नेटवर्किंग साईटवर सांगितलंय. लवकरच आपण कामावर परतणार असून फॅन्सना हसवण्यासाठी सज्ज होणार असल्याचा निर्धारही तिनं केलाय.