Join us

ऑल इज वेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 17:07 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अक्षरा म्हणजेच हिना खान सेटवर कोणाचेच ऐकत नाही. तसेच मालिकेच्या कथेत बदल केले जावेत अशी सतत मागणी करत आहे अशा बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अक्षरा म्हणजेच हिना खान सेटवर कोणाचेच ऐकत नाही. तसेच मालिकेच्या कथेत बदल केले जावेत अशी सतत मागणी करत आहे अशा बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. पण तसे काहीही नसून सेटवरचे वातावरण अतिशय चांगले असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेच्या टीममधील अनेकजण चित्रीकरणासाठी नुकतेच स्वित्झर्लंडला गेले होते. या चित्रीकरणाच्यादरम्यान या टीमची चांगलीच गट्टी जमली होती. तसेच या मालिकेचे नुकतेच 2200 भाग पूर्ण झाले आहेत. या सेलिब्रेशनच्यावेळीदेखील या सगळ्यांनी एकत्र मिळून खूप मजामस्ती केली. त्यामुळे या टीममधील मंडळींमध्ये काहीही मतभेद नसल्याचे आता उघड झाले आहे. या मालिकेत विशाल सिंगने नुकतीच एंट्री केली आहे. त्याच्या एंट्रीनंतर कथानकाला नवीन वळणे देण्यात येणार आहेत.