Join us

या सगळ्या केवळ अफवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 18:50 IST

ये है मोहोब्बते या मालिकेत भावा-बहिणीची भूमिका साकारणारे अभिषेक वर्मा आणि आदिती भाटिया यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्या कित्येक ...

ये है मोहोब्बते या मालिकेत भावा-बहिणीची भूमिका साकारणारे अभिषेक वर्मा आणि आदिती भाटिया यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. पण आम्ही दोघे केवळ चांगले मित्रमैत्रिणी आहोत असे त्या दोघांचे मत आहे. अभिषेक आणि आदिती चित्रीकरणाच्यावेळी नेहमी एकत्र असतात. तसेच चित्रीकरण संपल्यावरही दोघे एकत्र फिरायला जातात. त्यामुळे या दोघांमध्ये कुछ तो गडबड है अशी चर्चा होती. पण आमच्याबाबतच्या अशा अफवा कोण पसरवत आहेत हेच आम्हाला कळत नाहीये असे अभिषेकचे म्हणणे आहे तर मी प्रेमप्रकरणात पडण्यासाठी खूपच लहान आहे. सध्या माझे सगळे लक्ष हे केवळ माझ्या अभिनयाकडे आहे असे आदिती भाटिया सांगते.