Join us
Daily Top 2Weekly Top 5

अलीला आठवण येतेय मिहीकाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 17:25 IST

मालिकेत काम करत असताना कलाकार एकमेकांसोबत दिवसातील १०-१२ तास घालवत असतात.ये है मोहब्बते ही मालिका गेले कित्येक महिने सुरू ...

मालिकेत काम करत असताना कलाकार एकमेकांसोबत दिवसातील १०-१२ तास घालवत असतात.ये है मोहब्बते ही मालिका गेले कित्येक महिने सुरू आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकार हे एक कुटुंबच बनले आहे. या मालिकेत मिहिकाची भूमिका साकारणारी मिहिका वर्मा हिने काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक कारणांमुळे मालिका सोडली. अनंगिका हुंडल ही अभिनेत्री सध्या मिहिकाची भूमिका साकारत आहे. पण मालिकेत मिहिकाच्या पतीच्या भूमिकेत असलेला अली मिहिका वर्माला खूप मिस करत आहे. मालिकेच्या चितीकरणाच्या दरम्यान अली आणि मिहिका हे खूप चांगले मित्रमैत्रीण झाले होते. त्यामुळे माझ्या लाडक्या मैत्रिणीची मला सतत आठवण येते असे अली सांगतो.