Join us

​ढाई किलो प्रेम या मालिकेत झळकणार अली गोनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 14:38 IST

अली गोनीने स्प्लिटव्हिला या कार्यक्रमापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. यै है मोहाब्बते, कलश, कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ ...

अली गोनीने स्प्लिटव्हिला या कार्यक्रमापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. यै है मोहाब्बते, कलश, कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. ये है मोहोब्बते या मालिकेत त्याने साकारलेली रोमी ही भूमिका प्रचंड गाजली होती. आता अली प्रेक्षकांना ढाई किलो प्रेम या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी किश्वर मर्चंट एका छोट्याशा भूमिकेत झळकली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. किश्वरनंतर अली आता छोट्याशा पण एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.संदीप सिकंद आणि बालाजी टेलिफ्लिमसची ही मालिका असल्याने अलीने या भूमिकेसाठी लगेचच होकार दिला. अलीची या मालिकेतील भूमिका छोटी असली तरी या भूमिकेमुळे मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे. दिपिकाने आणि तिच्या कुटुंबाने आपले शहर सोडून आग्रा येथे स्थायिक होण्यामागे एक खास कारण आहे आणि हेच कारण अली असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अली हा दिपिकाचा म्हणजेच अंजली आनंदचा भूतकाळ असल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्याच्यामुळेच दिपिकाच्या कुटुंबाने त्यांचे शहर सोडले आहे.अलीने या मालिकेच्या चित्रीकरणासाठी अद्याप सुरुवात केली नसली तरी तो लवकरच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. त्याच्या या भूमिकेला काहीशी नकारात्मक शेड असून या मालिकेत काम करण्यासाठी अली खूप उत्सुक आहे.