Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अलाद्दिन'मध्‍ये जिनू दिसणार नवीन अवतारामध्‍ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 07:15 IST

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन - नाम तो सुना होगा'ने अद्भुत कथांसह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केले आहे. नवनवीन पटकथा आणि अभूतपूर्व कथानकासह प्रेक्षकांना त्‍यांच्‍या लाडक्‍या जिनूची (राशुल टंडन) नवीन बाजू पाहायला मिळणार आहे.

जफरला (आमिर दळवी) उमर (गिरीश सचदेव) आणि अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) यांच्‍यामधील संबंधाविषयी सर्व काही समजते. तो अलाद्दिनला पकडण्‍यासाठी मोठा डावपेच रचतो. तो वडिल व मुलगा यांच्‍यामध्‍ये भांडण लावून देणार आहे. जिनूचे अलाद्दिनसोबतचे नाते पाहता तो जिनीला त्‍याच्‍या सर्व जुन्‍या आठवणींसह अलाद्दिन व अम्‍मीसोबत असलेल्‍या अद्वितीय आठवणींना देखील विसरण्‍याचा आदेश देतो. विरोध करून देखील त्‍याच्‍यावर नवीन अवतार घेण्‍याचा दबाव येतो. या नवीन अवतारामध्‍ये त्‍याला गतकाळाचे काहीच माहित नसते. जिनू चांगला व्‍यक्‍तीच राहिल का की, आपल्‍याला त्‍याची दुष्‍ट बाजू पाहायला मिळेल?

जिनूची भूमिका साकारणारा राशुल टंडन म्‍हणाला, 'या आठवड्यात प्रेक्षकांना रियल ट्रीट मिळणार आहे. जिनू नवीन अवतार घेणार आहे, ज्‍याबाबत कोणीच यापूर्वी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही. तो चांगला व्‍यक्‍ती असेल की दुष्‍ट असेल, तसेच त्‍याला अलाद्दिनसोबतच्या मैत्रीबाबत आठवेल का, याबाबत काळच सांगेल. '

टॅग्स :अल्लादिनसोनी सब