'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी हार्दिक जोशी (Hardik Joshi)-अक्षया देवधर (Akshaya Deodhar) २ डिसेंबरला पुण्यात लग्नबेडीत अडकले. अक्षया-हार्दिकचे लग्न कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडले. दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर आता त्यांची पहिली सत्यनारायण पूजादेखील पार पडली आहे. या पूजेचा फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे.
मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर पहिल्यांदाच दोघांचा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता. आता लग्नानंतर त्याची पहिली सत्यनारायण पूजादेखील पार पडली. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अक्षया देवधरने इंस्टाग्राम स्टोरीवर सत्यनारायणाच्या पूजेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षया आणि हार्दिक पूजेला बसलेले दिसत आहेत. यावेळी अक्षयाने गुलाबी रंगाची साडी तर पोपटी रंगाचा सदरा आणि जांभळ्या रंगाचे धोतर नेसले आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.