Join us

अक्षय साकारणार दादा कोंडके....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 21:58 IST

           बॉलीवुड मधील खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार त्याच्या स्टंट अन हटके अंदाज मुळे प्रसिद्ध ...

           बॉलीवुड मधील खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार त्याच्या स्टंट अन हटके अंदाज मुळे प्रसिद्ध आहे. अक्षयने एका मराठी चित्रपटामध्ये गेस्ट अपियरन्स करुन मराठी रसिकांची मने जिंकली होती. तो उत्तम मराठी बोलतो हे तर आपल्याला माहितच आहे. आणि त्याच्या मराठीतील आगमनानंतर त्याचे मराठी चित्रपटाविषयी असणारे प्रेम देखील दिसुन येते. अक्षय आता अ‍ॅज अ हिरो म्हणुन मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करीत असल्याचे समजते. हा खिलाडी कुमार चित्रपट बनवतोय ते पण लीजेंडरी दादा कोंडके यांच्या बायोपिकवर.           एकटा जीव सदाशिव या दादा कोंडकेंच्या आत्मचरित्राचे हक्क अक्षयने विकत घेतले असल्याचे समजते. एवढेच नाही तर त्याने एका कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट करण्याची इच्छा असल्याचेही बोलुन दाखविले होते. आता तो चित्रपट दादा कोंडकेंच्या जीवनावरील आहे का हे आपल्याला लवकरच समजेल. बॉलीवुड कलाकार देखील आता मराठी चित्रपटांकडे वळत असुन मराठी सिनेमे करण्यास उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. आता आपला स्टंट मॅन अक्षय मराठीत काय वेगळे करतोय याकडेच त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागुन राहील.