अक्षय कुमारला का आली सलीम खान यांची आठवण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 14:03 IST
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ची नववे सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने आजवर कपिल शर्मा, राजू श्रीवास्तव ...
अक्षय कुमारला का आली सलीम खान यांची आठवण?
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ची नववे सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने आजवर कपिल शर्मा, राजू श्रीवास्तव तसेच भारती सिंह यासारखे महान विनोदवीर भारतीय प्रेक्षकांना दिले आहेत.या कार्यक्रमाच्या एका भागात अक्षयकुमारने नामवंत पटकथालेखक सलीम खान यांनी विनोदासंदर्भात केलेल्या एका वक्तव्याचा दाखला दिला. तो म्हणाला, “सलीम खान यांनी चित्रपटांतील विनोदाबद्दल एक महत्त्वाचं आणि आगळं निरीक्षण नोंदविलं होतं. ते मला म्हणाले होते की भारतीय चित्रपट उद्योगाला विनोदाची जाण नाही. कोणताही अभिनेता विनोदी भूमिका साकारल्यानंतरच खऱ्या अर्थाने उत्तम अभिनेता बनतो.”भारतीय चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन आणि करमणुकीचा भाग म्हणूनच विनोदाचा समावेश केला जातो. अक्षयने पुढे सांगितले, “सलीम खान यांनी मला उदाहरण देऊन सांगितलं की अमिताभ बच्चनसारख्या कलाकारालाही विनोदाचा आश्रय घेतल्यावरच अभूतपूर्व यशाची चव चाखायला मिळाली होती.” अक्षयवर सलीम खान यांच्या विनोदावरील या विचारांचा चांगलाच प्रभाव पडला असून विनोदाला केंद्रस्थानी आणायचे असून त्याच्याशी जोडलेल्या नकारात्मक भावना नष्ट करायच्या आहेत.ALSO READ : जाणून घ्या अक्षय कुमारच्या आयुष्यातील सगळ्यात आवडती व्यक्ती कोण?द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ नवव्या सीजनमध्ये अक्षय कुमार सुपर जजच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने आतापर्यंत्या आपल्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. एअरलिफ्ट, रुस्तम, बेबी यासारखे वेगळ्या थाटणीचे चित्रपट अक्षयने गेल्या काही वर्षात बॉलिवूडला दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत अक्षयने काम केलेले जवळपास सगळेच चित्रपट हिट गेले. सध्या अक्षयचा टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजनंतर एक महिन्यानंतर ही गल्ला जमावतो आहे. या चित्रपटाने त्याचा पाच वर्षातला रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अक्षयने काही महिन्यांपूर्वी गोल्ड चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे. हा चित्रपट भारतीय हॉकी संघाच्या ऑल्मिपिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. यात अक्षय कुमार भारतीय हॉकी संघाचे कोच बलबीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.