Join us

"मी सगळं बघतो तुझं, खूप चांगलं..." प्रणित मोरेशी अक्षयचा मराठीतून संंवाद, कौतुक करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 10:16 IST

"फिल्मसिटीच्या बाहेर गेटवर आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय..." प्रणित मोरेला काय म्हणाला अक्षय कुमार?

Akshay Kumar Praised Praneet More : 'बिग बॉस १९'चं  (Bigg Boss 19) यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास आहे. या पर्वात प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन 'महाराष्ट्रीयन भाऊ' (Maharashtriyan Bhau) प्रणित मोरे (Pranit More) सहभागी झालाय. पहिल्या दिवसापासूनच प्रणितने 'बिग बॉस'च्या घरात त्याची जागा बनवायला सुरुवात केली आहे. त्याने त्याच्या कॉमेडीने 'बिग बॉस'च्या घरालाच हास्याचा कट्टा बनवून टाकलं आहे. आता नुकतंच 'बिग बॉस १९'च्या तिसऱ्या आठवड्याचा 'वीकेंड का वार' झाला. या 'वीकेंड का वार'मध्ये यावेळी सलमान खानऐवजी बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार, अरशद वारसी आणि फराह खान हे सूत्रसंचालन करताना दिसले. शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांशी संवाद साधताना अक्षयने प्रणित मोरेसोबत  (Pranit More) खास मराठीतून संवाद साधला. तसेच त्याचं कौतुकही केलं.

'बिग बॉस'च्या घरात अनेक हिंदी भाषिक कलाकार असले तरी यावेळी अक्षय कुमारने मराठमोळ्या प्रणित मोरेशी थेट मराठीतून संवाद साधला. एका टास्कदम्यान स्पर्धकांना कटघऱ्यात उभं केलं होतं. त्यावेळी आरोपी ठरलेल्या स्पर्धकांच्यासमोर तुरुंगाचा बार अर्थात एक-एका दांडा लावण्यात आला. यावेळी अक्षयनं तो दांडा लावायचं काम प्रणितला दिला. अक्षय म्हणाला, "प्रणित दांडा लावायचं काम तुझं भाऊ... ओ भाऊ... मला खूप आवडतं दांडा लावायला, मी सगळं बघतो तुझं", असं अक्षय कुमारनं म्हटलं".

प्रणितशी बोलताना अक्षयनं त्याचं कौतुकही केलं. अक्षयनं विचारलं, "प्रणित कसं चाललंय सगळं? बरंय...?" यावर प्रणित म्हणतो "एकदम मस्त सर...". तर अक्षय म्हणतो, "सलमानने तर तू बनवलेले सर्व रिल्स पाहिले, मी पण तू बनवलेले रिल्स पाहिले. मी तुला सांगतो, फिल्मसिटीच्या बाहेर गेटवर आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय. तू आल्यावरचं तुला भेटूया. पण, काय नाही... तुला सांगू प्रणित खूप चांगलंय... तू स्टँड-अप कॉमेडी कर... आमच्यावर जोक बनवं, लोकांना हसवं, चांगलंय", असं म्हटलं. अक्षयने मराठीतून संंवाद साधल्यानं फक्त प्रणितला नाही तर मराठी प्रेक्षकांनाही सुखद धक्का बसला. 

प्रणित मोरे कोण? मराठमोळा प्रणित मोरे हा प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आहे. प्रणितनं त्याच्या क्लासी कॉमेडी टायमिंगनं अनेकांची मनं जिंकली आहेत. तसेच, अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. आतापर्यंत त्यानं अनेक कॉमेडी शो केले आहेत. त्याचं युट्यूबवरही स्टँड अप कॉमेडीचं चॅनल आहे. इंस्टाग्रामपासून युट्यूबपर्यंत, प्रणितच्या व्हिडीओंना लोकांकडून खूप प्रेम मिळतं.

टॅग्स :बिग बॉस १९अक्षय कुमारसलमान खान