Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षर कोठारी म्हणतोय “तूच तुझी ढाल हो”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 15:43 IST

'चाहुल' मालिका फेम अक्षर कोठारीने महिला दिनाचे औचित्य साधत एक सुंदर संदेश दिला आहे. त्याविषयी तो म्हणतो,“माझ्या घरी माझी ...

'चाहुल' मालिका फेम अक्षर कोठारीने महिला दिनाचे औचित्य साधत एक सुंदर संदेश दिला आहे. त्याविषयी तो म्हणतो,“माझ्या घरी माझी बहिण, आई, आणि माझी बायको हीच माझी ताकद आहे. स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे, तिला कोणाच्या मदतीची वा तिची कोणी ढाल होण्याची गरज नाहीये. ती स्वत:चे रक्षण स्वत:च करू शकते इतके सामर्थ्य आहे तिच्यामध्ये. कोणत्याही स्त्रीला तिचे रक्षण करण्यासाठी भावाची, नवऱ्याची किंवा वडिलांची गरज वाटायला नको. वेळ पडली तर ती संपूर्ण जगावर हावी होऊ शकते इतकी ताकद आहे तिच्यामध्ये. आणि जेंव्हा हे त्यांना कळेल तेंव्हा त्यांचे भाऊ, नवरा,वडील या सगळ्यांचीच चिंता मिटेल कारण त्यांना माहिती असेल कि माझ्या आयुष्यात असलेली स्त्री स्वत:चे रक्षण करू शकते. त्यामुळे या नवीन वर्षी या गोष्टीचा नक्की विचार करा आणि ते सामर्थ्य स्वत  मध्ये आणा असे सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'चाहुल' मालिकेआधी तो 'कमला' या मालिकेत झळकला होता.कमलामध्ये अक्षरने एका प्रगल्भ विचारांचा,अहंकारी, संसारी, परिस्थितीला हताश न होणाºया पत्रकाराचा रोल साकारलेला होता. मात्र चाहूल या मालिकेमध्ये सर्जेरावची भूमिका साकारत आहे.या मालिकेत उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेला सर्जेराव भोसले म्हणजेच अक्षर कोठारी सुमारे एका दशकानंतर सातारा जिल्हयातील भवानीपूर या त्याच्या मूळ गावी परततो, तो त्याच्या होणा-या बायकोसह जेनिफरसह जेनिफर ही पदरेशी तरुणी सर्जेरावला त्याच्या परदेश वास्तव्या दरम्यान भेटलेली असते आणि सर्जेरावच्या प्रेमासाठी ती तिचा देश, तिची माणसं सोडून, सजेर्रावशी आणि त्याच्या माणसांशी नातं जोडायला भारतात, भवानीपुरात आली येते. मात्र सजेर्राव आणि जेनिफर यांच्या प्रेमात, त्यांच्या लग्नात अडथळा येऊ लागतो एका अज्ञात शक्तीमुळे आणि मग प्रवास सुरू होतो एका गूढाच्या शोधाचा, एका अमानवी  गुढ रहस्यावर ही मालिका भाष्य करते.