मुहर्त लागला अखिर चित्रपटाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 03:12 IST
दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा वन टू थ्री फोर या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी अखिर मुहर्त मिळाला. या चित्रपटाची शुटिंग एक ...
मुहर्त लागला अखिर चित्रपटाला
दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा वन टू थ्री फोर या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी अखिर मुहर्त मिळाला. या चित्रपटाची शुटिंग एक ते दीड वर्षापूर्वीच संपली होती.परंतु शेवटी बºयाच प्रतिक्षेनंतर हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाने कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कारांवर बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी सॅटिनिओ यांना तर सर्वोत्कृष्ट संगीतासाठी अमितराज यांना गौरविण्यात आले. वन टू थ्री फोर हा सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, अंशुमन विचारे, विशाखा सुभेदार, अनिकेत केळकर, तेजा देवकर, विजया मौर्या, संजय मोने,किशोर चौघुले, अभिजीत चव्हाण या कलाकारांचा समावेश आहे.