Join us
Daily Top 2Weekly Top 5

​विघ्नहर्ता गणेश या मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षा पुरीला या एका दृश्यासाठी घ्यावी लागली मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 13:58 IST

विघ्नहर्ता गणेश ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपती ...

विघ्नहर्ता गणेश ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपती बाप्पावर आधारित आजवर अनेक मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. पण तरीही ही मालिका आपले एक वेगळेपण जपून आहे. या मालिकेचे सादरीकरण हेच या मालिकेचे वैशिष्ट्य आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना पार्वतीचा दुर्गावतार पाहायला मिळणार आहे. दुर्गामातेचे पहिले चित्र जर कुणाच्याही नजरेपुढे येत असेल तर ते महिषासुर मर्दिनीच्या मुद्रेतील असते. ही मुद्रा आजवर अनेक चित्रपटांत आणि मालिकांमध्ये विविध प्रकारे साकारण्यात आलेली आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील विघ्नहर्ता गणेश मालिकेत पार्वती दुर्गाचा अवतार धारण करते, तेव्हा हीच मुद्रा प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. चित्रीकरणादरम्यान पार्वतीची भूमिका करणार्‍या आकांक्षाला या मुद्रेचा अनेक तास सराव करावा लागला. हातात त्रिशूळ घेतलेले रौद्र रूप आणि एका पायावर केलेले शरीराचे संतुलन अचूक दाखवण्यासाठी तिला अनेकवेळा ते करावे लागले. आकांक्षाने या दृश्यासाठी खूपच मेहनत घेतली. याविषयी आकांक्षा पुरी सांगते, “महिषासुराचा वध करताना दुर्गा मातेची जी मुद्रा आहे, तीच नेहमी सर्वप्रथम आपल्या नजरेसमोर येते. पण ही मुद्रा धारण करणे वाटते तितके सोपे नाही. शरीराचे संतुलन साधायला, त्रिशूळ योग्य पद्धतीने धरायला आणि रौद्र मुद्रा करून त्या स्थितीत स्थिर उभे राहण्यासाठी धीर, चिकाटी आणि सराव याची आवश्यकता असते. सुरूवातीला मला वाटले की हे सोपे आहे. पण नंतर मला जाणवले की कुणीही सहज करावी अशी ही साधीसुधी मुद्रा आणि हावभाव नाहीत. हा शॉट अचूक करण्यासाठी मला कित्येक दिवस याचा सराव करावा लागला. हा शॉट ओके झाल्यावर मला वाटले, जणू मी काहीतरी मोठेच साध्य केले आहे. मी आजवर केलेल्या खूप अवघड दृश्यांपैकी हे एक दृश्य होते. पण मला आनंद होत आहे की मी ते चांगल्या रीतीने करू शकले. माझ्या चाहत्यांची या दृश्यावरील प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”Also Read : टेलिव्हिजनवर काम करणे एन्जॉय करतेयः आकांक्षा पुरी