राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. काल सकाळी अजित पवार हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना अपघात झाला. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता. 'एकच वादा, अजित दादा', 'अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे', 'परत या, परत या, अजित दादा परत या…' 'दादा, दादा…' असा हंबरडा फोडत हजारोंच्या साश्रू नयनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला.
'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाण अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. सूरजनं अजित पवारांचं अंत्यदर्शन घेताना त्याने अत्यंत आदराने डोक टेकवून हात जोडून नमस्कार केला. यावेळी तो भावुक झाल्याचं दिसलं. सूरजनं व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, "आई-वडिलांनंतर मी तुमच्यात माझे आई-आप्पा पाहत होतो आणि तुम्ही पण मला सोडून गेलात. आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं? मिस यू दादा", अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी त्यांची कारकीर्द चांगलीच गाजवली होती. लोकांचं काम करणारा नेता, म्हणून अजित पवारांची ओळख होती. सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला आणि सूरज चव्हाणला टुमदार घर बांधून दिलं. विशेष म्हणजे घराचं बांधकाम सुरु असताना त्यांनी स्वत: पाहणी केली होती.
Web Summary : Ajit Pawar's death in a plane crash led to a massive outpouring of grief. 'Bigg Boss' winner Suraj Chavan, deeply saddened, expressed his feelings of loss, remembering Pawar as a parental figure who also gifted him a house.
Web Summary : अजित पवार के विमान दुर्घटना में निधन से शोक की लहर दौड़ गई। 'बिग बॉस' विजेता सूरज चव्हाण ने दुख व्यक्त करते हुए कहा कि उन्होंने पवार को एक अभिभावक के रूप में देखा, जिन्होंने उन्हें घर भी उपहार में दिया था।