महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज मुंबईहून विमानाने बारामतीमध्ये येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना, लँडिंगवेळी अपघात झाला आणि विमान शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. नेतेमंडळींसह सिनेसृष्टीतील कलाकारांनाही अश्रू अनावर झालेत. लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने अजित पवार यांच्यासाठी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, ती वाचून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले आहेत.
ज्याला राजकारण सुद्धा माहीत नाही आज तोही हळहळतोय... असं म्हणत अश्विनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं,
मला मरणाआधी थोडा वेळ दे देवा...खूप कामं बाकी आहेत ती पटकन करतो,काही माणसांना भेटायचं आहे, तेही पटकन भेटतोकामांचे आराखडे कोणाच्या तरी हातात सुपूर्त करतोपुढच्या ५ वर्षाचे तरी प्लानिंग सेट आहे ते सांगायलामित्रासोबतचा चहा तोही राहून नको जायलाशेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा आहेत्यावर तोडगा काढला होता एका रात्रीते आमलात आणायचे बाकी आहे,महाराष्ट्राचा बाप व्हायचं आहे तेवढं करतो,पण तू मरणा आधी थोडा वेळ दे देवादादा गेले म्हणे.. अरे असे कसे जातील.. प्रचार सभा लाईनअप आहेत अजून.. त्यांना ऐकणं बाकी आहे अजून
राजकारण समजून घेणारा कार्यकर्ता... अशा शब्दांत तिने प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्यात.
Web Summary : Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. Actress Ashwini Mahangade's emotional post expressing the sentiments of a political worker has gone viral, moving many to tears.
Web Summary : बारामती के पास एक विमान दुर्घटना में अजित पवार का दुखद निधन हो गया। अभिनेत्री अश्विनी महांगडे की एक भावनात्मक पोस्ट वायरल हो गई है, जिसमें एक राजनीतिक कार्यकर्ता की भावनाओं को व्यक्त किया गया है, जिससे कई लोग भावुक हो गए हैं।