Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजयने दिल्या वत्सलला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 17:43 IST

रिश्तों का सौदागर-बाझीगर या मालिकेत वत्सल सेठ प्रमुख भूमिका साकारत आहे. वत्सलने टारझन द वंडर कार या चित्रपटात अजय ...

रिश्तों का सौदागर-बाझीगर या मालिकेत वत्सल सेठ प्रमुख भूमिका साकारत आहे. वत्सलने टारझन द वंडर कार या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी वत्सल आणि अजयची चांगलीच मैत्री जमली होती. अजय नेहमीच वत्सलला मार्गदर्शन करत असतो. वत्सलची नवी मालिका सुरू होत आहे हे कळताच अजयने त्याला सोशल नेटवर्किंगद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. या मालिकेत इशिता दत्ताही प्रमुख भूमिकेत आहे. इशिताने दृश्यम या चित्रपटात अजयसोबत काम केले होते. यामुळे अजय रिश्तों का सौदागर-बाझीगर या मालिकेसाठी खूप उत्सुक असल्याचे कळतेय.