Join us

ऐश्वर्या रॉय बच्चन,करिना कपूर नाही, तर ही अभिनेत्री आहे ग्लॅमरस मॉम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 16:44 IST

सध्या श्वेताही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. तिचे रेयांशसह क्लिक केलेले फोटो नेटीझन्सकडून खूप पसंत केले जात आहेत.

बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींनी बाळाला जन्म दिला तेव्हा त्यांच्या फॅमिलीसह त्यांच्या फॅन्ससाठी ही गोड बातमी ठरली. जेव्हा ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला तेव्हा बी-टाऊनमध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन ग्लॅमसर मॉम असल्याचे बोलले जात  होते. जिथे जिथे ऐश्वर्यांला आराध्यासह पाहिले जायचे तिथे ग्लॅमरस मॉम ऐश्वर्या असा उल्लेख नाही झाला तरच नवल. त्या पाठोपाठ करिना कपूर खानची ग्लॅमसर मॉमच्या यादीत गणना होऊ लागलीे. तिने तर तिच्या प्रेग्नंसी दरम्यानच्या सगळ्या गोष्टी तिच्या चाहत्यांपर्यतं पोहचवल्या. ख-या अर्थाने प्रेग्नंसीचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी खूप नाजूक असतो. मात्र यांवर जास्त विचार न करता करिनाने तिची प्रेग्नंसीही ग्लॅमसर बनवली.त्यामुळे तिच्या चाहते करिनाचे जन्म देणारे बाळ नेमके कसे असणार याकडेच लक्ष लावून बसले होते.जेव्हा करिनाने तैमुर या गोंडस बाळाला जन्म दिला, तेव्हा तिच्यावर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.बाळाला जन्म दिल्यानंतर आता करिना पुन्हा कामात व्यस्त झालीय,मात्र तिचे तैमुरसह सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो पाहून करिना कपूरलाही ग्लॅमरस मॉम म्हटले जाऊ लागले. मात्र आता या सगळ्यांना पछाडत एक टीव्ही अभिनेत्री या सगळ्यांपेक्षाही अधिक ग्लँमरस मॉम भासू लागली आहे. होय,आम्ही बोलतोय 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीबद्दल.गेल्याच वर्षी तिने रेयांश या गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर श्वेता आणि रेयांशसह बाहेर फिरतानाचा अंदाज अधिक ग्लॅमरस वाटतो. त्यामुळे श्वेताला इंडस्ट्रीत आता स्टाइलिश मम्मी म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे.सध्या श्वेताही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. तिचे रेयांशसह क्लिक केलेले फोटो नेटीझन्सकडून खूप पसंत केले जात आहेत.श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीबरोबर झाले होते.त्या दोघांना पलक नावाची 15 वर्षाची मुलगी आहे.मात्र  2009 मध्ये श्वेताने राजा चौधरीला घटस्फोट दिला. त्यानंतर 2013 मध्ये तिने अभिनेता अभिनव कोहली बरोबर दुसरे लग्न केले.रेयांश हा तिचा दुसरा मुलगा आहे.