Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘बिग बॉस’फेम एजाज खानविरूद्ध ऐश्वर्या पोलिसात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 20:27 IST

‘बिग बॉस’ फेम एजाज खान वांद्यात सापडला आहे. मॉडेल ऐश्वर्या चौबे हिने एजाजविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.  अश्लिल मॅसेज ...

‘बिग बॉस’ फेम एजाज खान वांद्यात सापडला आहे. मॉडेल ऐश्वर्या चौबे हिने एजाजविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.  अश्लिल मॅसेज व फोटोज पाठविल्याचा आरोप ऐश्वर्याने एजाजवर केला आहे. ऐश्वर्या काश्मीरची राहणारी असून सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. एजाजने मला जुहूच्या एका हॉटेलात बोलवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने मला काही अश्लिल मॅसेज पाठवलेत, असा आरोप ऐश्वर्याने आपल्या तक्रारीत केला आहे. हे प्रकरण सध्या वर्सोवा पोलिस ठाण्यात आहे. वृत्त लिहिपर्यंत तरी एजाजला याप्रकरणात अटक झालेली नव्हती. एजाज खान काही हिंदी व दक्षिणात्य चित्रपटात काम करून चुकला आहे. ‘बिग बॉस’मध्ये एक स्पर्धक अली यास एजाजने मारहाण केली होती. त्यामुळे त्याला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढण्यात आले होते. गतवर्षी ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’चा एजाजचा एपिसोड टेलिकास्ट झाला नव्हता. यामुळे एजाज जाम चिडला होता. कपिल शर्मावर त्याने सर्व भडास काढली होती.