अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी. खऱ्या आयुष्यात नवरा - बायको असलेले हे दोघे रिल लाईफमध्येही एकमेकांच्या पती-पत्नीच्या भूमिका साकारतात. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाशसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. ऐश्वर्या लिहितात, ''प्रिय अवि, तू माझं inspiration आहेस. मी रोज काहीतरी तुझ्याकडून नवीन शिकत आलेय.''
''तुझं तुझ्या कामावर असलेलं प्रेम, जगण्यातली, काम करण्यातली जिद्द, सतत हसरा चेहरा ह्या सगळ्यातच तुझ्या जगण्याचं रसायन दडलेलं आहे. गेले काही दिवस तुला पुरेसा आराम मिळत नाहिये .. खूप धावपळ होतेय.. तरी देखील तू तेवढ्याच जिद्दीने काम करतोयस. दोन मालिका आणि दोन नाटकं करतोयस पण तुला दिवसाअखेरी कधीच थकलेलं बघितलं नाही मी!!''
''२७ सप्टेंबरला आपल्या शेवग्याच्या शेंगा नाटकाचा शुभारंभ पुण्यात पार पडला. त्या दिवशी तू सलग तीन प्रयोग न थकता आणि full energy ने केलेस. आणि शेवटच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांशी भेटताना तेव्हढ्याच हसतमुख चेहऱ्याने भेटलास. अगदी परवा सुद्धा पुण्यातला दुपारी १२:१५ चा आपला शेवग्याच्या शेंगाचा प्रयोग करून मुंबईला प्रवास आणि रात्री ८:३० वाजताचा पुरुष नाटकाचा प्रयोग केलास!''''रात्री उशिरा घरी येऊन पुन्हा शूटसाठी पहाटे घर सोडलंस आणि नंतर दादरला आपला शेवग्याच्या शेंगाचा प्रयोग होता ...कसं जमतं रे तुला? इतकी ताकद कुठून येते तुझ्यात? सहकलाकर म्हणून काम करताना तुझा अभिमान वाटतोच पण तुझी बायको असण्याचा अभिमान त्याही पेक्षा जास्त आहे. तुझे कष्ट, तुझी जिद्द, तुझं प्रेम, तुझी स्वप्नं इतक्या जवळून मला अनुभवता येतंय या पेक्षा अजून काय हवं आयुष्यात? खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू ज्या ताकदीने काम करतोयस मलाही त्याच ताकदीने काम करता येऊदे. खूप खूप प्रेम... तुझी, पल्लू''
Web Summary : Aishwarya Narkar praises husband Avinash's dedication to work despite a hectic schedule of plays and serials. She admires his hard work and never-tiring attitude.
Web Summary : ऐश्वर्या नारकर ने पति अविनाश के नाटकों और धारावाहिकों के व्यस्त कार्यक्रम के बावजूद काम के प्रति समर्पण की सराहना की। वह उनकी कड़ी मेहनत और कभी न थकने वाले रवैये की प्रशंसा करती हैं।