Join us
Daily Top 2Weekly Top 5

शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत पाहायला मिळणार रंजक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:54 IST

शुभ्राने सोहमला सुद्धा सुझॅनशी संपर्क तोडण्याची ताकीद दिली आहे पण शुभ्राची जागा बळकावण्यासाठी सुझॅन प्रयत्न करतेय.

'झी मराठी'वरील 'अग्गबाई सूनबाई' ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम आणि आजोबा ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या घरातील एक झाली असून त्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेच्या नवीन पर्वामध्ये आसावरीने सर्व घराची सूत्र हाती घेतली असून सोहम तिचा राईट हॅन्ड झाला आहे. तर अभिजीत राजे यांनी स्वतःहून सर्व घरची जबाबदारी स्वीकारली आहे. 

ही मालिका आता उत्कंष्ठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत प्रेक्षकांनी अनुराग म्हणजेच अभिनेता चिन्मय उदगीरकरची एंट्री पाहिली. आधी या मालिकेत शुभ्राचे वेगळे रूप प्रेक्षकांनी पाहिली. आधी शुभ्रा थोडी बुजरी होती. सतत बबडूच्या काळजीत असलेली शुभ्रा 'मी करते ते बरोबर की नाही' हा भाव तिच्या मनात असायचा. बबडूची जबाबदारी असल्याने ती घरातच होती पण शुभ्राचा आत्मविश्वास आता परत आला असून तिने डीबीके फूड्स जॉईन केलं आहे. 

शुभ्राने सोहमला सुद्धा सुझॅनशी संपर्क तोडण्याची ताकीद दिली आहे पण शुभ्राची जागा बळकावण्यासाठी सुझॅन प्रयत्न करतेय. सोहमच्या घरी येऊन शुभ्राला घराच्या बाहेर घालवून त्या घरावर राज्य करण्याची स्वप्न सुझॅन पाहतेय. पण शुभ्रा देखील तिची खोड मोडण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

सुझॅनला जर हे घर आपलंस करायचा असेल तर या घरातील सुनेची सर्व कामं देखील करावी लागतील असं म्हणून शुभ्रा तिला कामाला जुंपते आणि तिच्याकडून घरची सर्व कामं करून घेते. यासगळ्यानंतर आता सुझॅनची अक्कल ठिकाणावर येणार कि ती पुन्हा शुभ्राला त्रास देण्यासाठी काही नवीन प्लांनिंग करणार? शुभ्रा सुझॅन आणि सोहमला कसं वठणीवर आणणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.   

टॅग्स :अग्गंबाई सूनबाई