Join us

‘अग्गंबाई सूनबाई’ तर 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा सिक्वेलच, रसिकांनीच सांगितली पुढची कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 19:34 IST

‘अग्गबाई सासुबाई’ मालिकेचा दुसरा भाग ‘अग्गबाई सूनबाई’ नावाने सुरु करण्यात आली. खरंतर मालिका सुरु झाली तेव्हापासून रसिकांनी फार काही पसंती दिली नव्हती.

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको'  प्रचंड सुरहिट ठरली होती. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. गुरुनाथ, राधिका आणि शनायाची जुगलबंदी असलेली ही मालिका अल्पावधीतच रसिकांची लाडकी मालिका बनली होती. गुरुनाथ म्हणजेच गॅरी (अभिजीत खांडकेकर) असो किंवा त्याच्या पैशावर लट्टू झालेली शनाया(रसिक सुनिल) असो, किंवा मग या दोघांना धडा शिकवणारी गुरुनाथ सुभेदारची बायको राधिका( अभिनेत्री अनिता दाते-केळकर ) असो यांच्यामुळे मालिका अखेरपर्यंत रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली होती. 

‘अग्गबाई सासुबाई’ मालिकेचा दुसरा भाग ‘अग्गबाई सूनबाई’ नावाने सुरु करण्यात आली. खरंतर मालिका सुरु झाली तेव्हापासून रसिकांनी फार काही पसंती दिली नव्हती. नव्या ढंगात मालिका असली तरी मालिकेतल्या कथेत नाविन्य काहीच जाणवले नाही. त्यामुळे मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हाच विविध प्रतिक्रीया देत मालिकेवर नापसंती दिल्याचे दिसले होते. 

आता तर मालिकेत  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिके सारखीच ‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका असल्याचे वाटत आहे.मालिकेत कलाकार जरी वेगळे असले तरी  कथानक मात्र  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसारखेच असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मालिकेच्या पहिल्या भागात सोहमला सडेतोड उत्तर देणारी शुभ्रा दाखवण्यात आली होती. त्याउलट दुस-या भागात शुभ्राचं पात्र अतिशय सौम्य दाखवण्यात आले आहे.

याशिवाय ती एक मुलाची म्हणजेच बबडूची आई आहे. सोहम आता तो शुभ्राला धोखाही देत आहे. त्याचं सुझेनशी अफेअर सुरू असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोहमच्या आयुष्यात शुभ्राव्यतिरिक्त दुसरे कोणीतरी असल्याचे शुभ्रालाही समजलं आहे.  त्यातच आता तिस-याची एंट्री होते. शुभ्राच्या आयुष्यात अनुराग गोखले नावाची नवी व्यक्ती आली आहे. चिन्मय उद्गीरकर ही भूमिका साकारत आहे. तेव्हा आता खरचं ही मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेच्या सिक्वलच असल्याचे रसिक म्हणत आहेत. 

‘अग्गंबाई सूनबाई’  मालिकेत सध्या सुरु असलेले कथानक 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत पूर्वी रसिकांनी पाहिले आहे. नविन काही तरी देण्याच्या प्रयत्नात मालिकेत काहीही नाविन्य नसल्याने रसिकही मालिकेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोअग्गंबाई सूनबाई