Join us

अग्गंबाई...! शुभ्रा-सोहमच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, एकाने दिला खरोखर लग्न करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 15:18 IST

सोहम व शुभ्राच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे.

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं पुन्हा एकदा 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केला आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं. अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे ही मालिका अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. 

अभिजित आणि आसावरीच्या लग्न सोहळ्यानंतर तर प्रेक्षकांना अग्गंबाई सासूबाई या मालिकेचे कथानक प्रचंड आवडत आहे. तसेच सध्या मालिकेत सोहम व शुभ्रामध्ये खटके उडत असले तरी त्यांचा सोशल मीडियावरील बाइकवरचा फोटो हिट होतो आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने शुभ्रासोबतचा बुलेटवरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत सोहमने म्हटलंय की, समान विचारांचे मित्र मिळणं अमूल्य आहे. फ्रेंड्स फॉरेव्हर.

सोहम व शुभ्राच्या या फोटोला चाहत्यांचे खूप लाइक्स मिळत आहेत. इतकेच नाहीतर कमेंट्सचा वर्षाव देखील होत आहे. कुणी म्हणतंय की दोघेही खूप चांगले काम करत आहात. तर चक्क एकाने तुम्ही खरोखर लग्न करा असे म्हटले आहे. तर परफेक्ट जोडी अशा वगैरे या फोटोंवर कमेंट्स येत आहेत.

अग्गंबाई सासूबाई मालिका सध्या टीआरपीमध्ये देखील पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत सध्या नवा ट्विस्ट आला आहे.

अभिजीत राजे कुलकर्णींच्या घरी काही दिवस राहण्यासाठी आले आहेत. त्यात राजेंना पळवून लावण्यासाठी सोहमची सुरू असलेली धडपड आणि सोसायटीतल्या लोकांचे टोमणे व त्यात त्रस्त झालेली आसावरी असे सध्या मालिकेत पहायला मिळत आहे.

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईझी मराठीतेजश्री प्रधान गिरिश ओकनिवेदिता सराफ