Join us
Daily Top 2Weekly Top 5

अग्गंबाई सूनबाईमध्ये शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 19:31 IST

अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून प्रेक्षकांना त्याऐवजी या मालिकेचा दुसरा सिझन पाहायला मिळणार आहे. 

ठळक मुद्देअग्गंबाई सासूबाईची जागा अग्गंबाई सूनबाई घेणार असून डॉ.गिरीश ओक आणि निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहे. पण शुभ्राच्या भूमिकेत असलेली तेजश्री प्रधान प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार नाहीये.

अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतील बबड्या, शुभ्रा, आसावरी, अभिजीत, आजोबा या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. या मालिकेची कथा देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून प्रेक्षकांना त्याऐवजी या मालिकेचा दुसरा सिझन पाहायला मिळणार आहे. 

अग्गंबाई सासूबाईची जागा अग्गंबाई सूनबाई घेणार असून डॉ.गिरीश ओक आणि निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहे. पण शुभ्राच्या भूमिकेत असलेली तेजश्री प्रधान प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार नाहीये. तेजश्रीच्या जागी आता उमा पेंढारकर ही अभिनेत्री दिसणार आहे. उमाने यापूर्वी 'स्वामिनी' मालिकेत पार्वतीबाईंची भूमिका साकरली होती. तसेच प्रेक्षकांचा लाडक्या बबड्या देखील या दुसऱ्या सिझनचा भाग नसणार आहे. याशिवाय अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील कोण कोण कलाकार अग्गंबाई सूनबाई या मालिकेत असणार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. या मालिकेचे टायटल साँग देखील वेगळे असणार आहे. 

अग्गंबाई सासूबाईप्रमाणे प्रेक्षकांना अग्गंबाई सूनबाई ही मालिका देखील तितकीच आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

टॅग्स :अग्गंबाई सासूबाई