Join us

वयाच्या 16 व्या वर्षीच या अभिनेत्रीने दिला होता जुळ्या मुलांना जन्म,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 16:28 IST

उर्वशीने आधी बालाजी प्रोडक्शनच्याच 'कसौटी जिंदगी की 'या मालिकेत 'कोमोलिका' ही नेगेटीव्ह भूमिका रंगवली होती.याच भूमिकेने उर्वशीला अमाप लोकप्रियता ...

उर्वशीने आधी बालाजी प्रोडक्शनच्याच 'कसौटी जिंदगी की 'या मालिकेत 'कोमोलिका' ही नेगेटीव्ह भूमिका रंगवली होती.याच भूमिकेने उर्वशीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. उर्वशीने 'बिग बॉस 6' सिझनचे विजेतेपद मिळवल्यानंतर 'बडी दू से आये है' या मालिकेत झळकली होती.सध्या ती उर्वशी एकता कपूरची 'चंद्रकांता' मालिकेत झळकत आहे. उर्वशी मालिकेत रानी इरावती नावाची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे उर्वशीने अगदी कमी वयात तिच्या खाजगी आयुष्यात खूप चढ उतार पाहिले आहेत. वयाच्या 15 व्या वर्षीच तिचे लग्न झाले होते.16 वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. सागर आणि क्षितिज असे त्यांचे नाव आहेत. लग्नाच्या दिडवर्षांनंतरच ती पतीपासून वेगळी झाल्याचे बोलले जाते. यानंतर तिने सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला.गेल्या 25 वर्षा सातत्याने ती अभियक्षेत्रात विविध भूमिकेतून रसिकांचे मनोरंजन करत आहे.रिअल लाईफमध्येही उर्वशी तितकीच धाडसी आहे. पहिले लग्न मोडल्यानंतर दुस-या लग्नाचा विचार का नाही केला असा एका मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उर्वशीने म्हटले होते की, अगदी कमी वयात खूप मोठी जबाबदारी तिच्यावर होती.जबाबदा-या वाढत गेल्या आणि स्वतःसाठी विचार करण्याचा वेळच मिळाला नाही.असे तिने सांगितले होते.खाजगी आयुष्याप्रमाणे तिचा अभिनयाचा प्रवास खडतर होता मात्र अशक्य नव्हता. या क्षेत्राने मला खुप काही दिले आहे.यामुळे मी म्हणू शकते की, माझा अभिनयाचा प्रवास खुप शानदार झालाय असे तिने सांगितले.आता तिच्या पाठोपाठ तिची मुलंही अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवणार असल्याचे कळतंय.उर्वशीचा लेक  सागर बॉलिवूडमध्ये कधी एंट्री मारणार याकडेच सा-यांच्या नजरा लागल्या आहेत.सागरने 'हमशकल' सिनेमासाठी दिग्दर्शक साजिद खानलाही असिस्ट केले होते.उर्वशी सध्या सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतंय.रसिकही आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असतात.त्यामुळे उर्वशीचे फॅन्स तिच्या सोशल मीडिया पेजलाही कनेक्ट असल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक करताना दिसतात.वयाची 40 पर्यंत पोहचलेली उर्वशी फिटनेस फ्रिक नसली तरी व्यायाम आणि मेडिटेशन करण्यावर तिचा भर असतो.