पुन्हा सासू-सूनेची भांडणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 10:48 IST
साथ निभाना साथिया ही मालिका गेली कित्येक वर्षं छोट्या पडद्यावर सुरू आहे. या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक नवी एंट्री ...
पुन्हा सासू-सूनेची भांडणं
साथ निभाना साथिया ही मालिका गेली कित्येक वर्षं छोट्या पडद्यावर सुरू आहे. या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. उत्कर्षा नाईक मालिकेत कृष्णाच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेत सासू-सूनेची कथा दाखवण्यासाठी उत्कर्षाची एंट्री होणार आहे. उत्कर्षा या मालिकेत एका पंजाबी स्त्रीची भूमिका साकारणार असून ती खूप अंधश्रद्धाळू असणार आहे. तिच्या स्वभावामुळे ती गोपीच्या नाकात दम आणणार आहे. या मालिकेसाठी उत्कर्षाने चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे. उत्कर्षा तिच्या या नव्या भूमिकेसाठी खूप उत्सुक असल्याचे सांगते.