Join us

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांना निरोप; जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 10:16 IST

उत्तम स्टारकास्ट असूनही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली आहे.

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी कोणती नवी मालिका सुरु होणार हे अद्याप कळलेले नाही. 

नवी मालिका येणार म्हटलं की तीची वेळ काय असेल, कोणत्या मालिकेच्या जागी ही मालिका येईल अर्थात कोणती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असे एक ना अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकर मिळतील.  

मीडिया रिपोर्टनुसार 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा येत्या काही दिवसांत शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. 

'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' या मालिकेची स्टारकास्ट उत्तम आहे.या मालिकेत सुकन्या कुलकर्णी आणि स्वानंदी टिकेकर मुख्य भूमिकेत होते.   मालिकेचा विषय वेगळ्या धाटणीचा आहे. पण तरीही टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली आहे. 

 

टॅग्स :झी मराठी