'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag Serial) मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्व पात्र घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेत अस्मिताच्या भूमिकेतून मोनिका दबडे(Monica Dabade)ला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. गेले काही दिवस तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. तिने नुकत्याच एका मुलीला जन्म दिला आहे. प्रेग्नेंसीतही ती मालिकेत काम करत होती. आता ती मुलीच्या जन्माच्या काही दिवसानंतर मालिकेत परतली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
मोनिका दबडे हिने इंस्टाग्रामवर ठरलं तर मग मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोतून समजते आहे की, ती बाळाला घेऊन सेटवर गेली आहे. याशिवाय तिने अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली, इतक कलाकार आणि स्क्रीनवरील फोटो देखील शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. ज्यात ती आनंदी दिसत आहे.
मोनिका दबडेने पुढे लिहिले की, ''आवडत्या लोकांसोबत, जगातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला घेऊन, आवडतं काम करायला मिळणं, यासाठी भाग्य लागतं..!!! स्टार प्रवाह, शमा सयैद, सोहम प्रॉडक्शन्स, सुचित्रा बांदेकर, सचिन गोखले, प्राजक्ता कुलकर्णी दिघे, जुई गडकरी, अमित भानुशाली, ज्योती चांदेकर, मयुरी मोहिते, प्रियंका तेंडूलकर, अतुल महाजना, प्रियंका दबडे, श्वेता सोनावणे आणि चिन्मय कुलकर्णी यांची मी आभारी आहेत. तुमच्या सगळ्यांमुळे हे शक्य होतंय. आणि निगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष , आपल्या आपल्या कामाकडे लक्ष.''