Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजश्री प्रधाननंतर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून या अभिनेत्रीची एक्झिट, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 11:48 IST

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेला आणखी एका अभिनेत्रीने निरोप दिला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta). या मालिकेतील सागर आणि मुक्ताची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. मालिका आता रंजक वळणावर आली. सागर कोळीची फॅमिली पूर्ण झाली आहे. आदित्यनेही मुक्ताचा आई म्हणून स्वीकार केला आहे. या मालिकेतून काही दिवसांपूर्वी अचानक तेजश्री प्रधान बाहेर पडली होती. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्रीने मालिकेला निरोप दिला आहे. ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात ना.

प्रेमाची गोष्ट मालिकेतून स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल सोमारे गजमल बाहेर पडली आहे. तिने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिने मालिकेच्या सेटवरचा फोटो शेअर करत लिहिले की, आता स्वातीला निरोप देण्याची वेळ आली आहे. पण प्रेमाची गोष्ट मालिकेतील आठवणी आणि शिकवण माझ्यासोबत कायम राहतील. या अद्भुत शोचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल स्टार प्रवाह आणि शशी सुमीत प्रॉडक्शन्सचे आभार! या मालिकेने मला एक नवीन कुटुंब दिले आहे आणि मी ते नेहमीच जपून ठेवेन.

अभिनेत्री कोमल सोमारे गजमल हिला प्रेमाची गोष्ट मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेली स्वाती घराघरात पोहचली. या मालिकेच्या आधी कोमलने कलर्स मराठी वाहिनीवरील सोन्याची पावलं मालिकेत पद्मिनी इनामदारची भूमिका साकरली होती. तसेच लक्ष्मीनारायण मालिकेत पार्वतीची आणि सन मराठीवरील प्रेमास रंग यावे मालिकेत पुष्पाची भूमिका साकारली होती.

टॅग्स :तेजश्री प्रधान स्टार प्रवाह