तब्बल 6 वर्षानंतर पुन्हा एकदा साक्षी तन्वर आणि राम कपूरची जमली जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 13:28 IST
भूमिकेतून करायचे आहेत वेगवेगळे प्रयोग ‘कहानी घर-घर की’या मालिकेतून पार्वती बनत घराघरांत पोहचलेली अभिनेत्री साक्षी तन्वरला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला ...
तब्बल 6 वर्षानंतर पुन्हा एकदा साक्षी तन्वर आणि राम कपूरची जमली जोडी!
भूमिकेतून करायचे आहेत वेगवेगळे प्रयोग ‘कहानी घर-घर की’या मालिकेतून पार्वती बनत घराघरांत पोहचलेली अभिनेत्री साक्षी तन्वरला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला आवडतात. 24 या सिरीजमध्येही शिवानी मलिक या भूमिकेला तिने योग्य न्याय दिला. नुकतेच 'दंबग' सिनेमात मि.परफेक्शनिस्टसह झळकलेल्या साक्षी तन्वरला तिच्या भूमिकेमुळे खूप कौतुकही झाले. आता पुन्हा 'कर ले तू मोहब्बत’ या वेबसिरीजच्या माध्यमातून साक्षी रसिकांच्या भेटीला आले आहेत. या भूमिकेविषयी बोलताना साक्षी म्हणाली मला जितक्या आव्हानात्मक भूमिका करायला मिळतील त्या मी स्विकारते.मुळात 'दंगल' सिनेमाआधीच या वेबसिरीजसाठी मी होकार दिला होता.विशेष म्हणजे या वेबसिरीजमध्ये साक्षी 'बडे अच्छे लगते है' या मालिकेनंतर पुन्हा एकदा राम कपूरसह झळकणार आहे.त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री पाहणे मनोरंजनाची ट्रीटच म्हणावी लागेल.या वेब सिरिजच्या निमित्ताने राम आणि साक्षीचा एक व्हिडिओ युट्युबला अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये माझ्या जोडीदाराला मी लवकरच तुमच्यासमोर आणणार असे बोललो होतो आणि ते वचन मी पूर्ण केले आहे असे रामने त्याच्या फॅन्सना त्यामध्ये एक मेसेजही देताना दिसतोय. त्यावेळी साक्षी तिच्या तोंडावर उशी घेऊन बसलेली दिसते आणि त्यानंतर ही उशी बाजूला करून राम त्याच्या या नायिकेला रसिकांशी ओळखही करून देताना दिसतोय.त्यामुळे आता छोट्या पडद्यावरही जोडी झळकणार नसून वेब सिरीजच्या माध्यमातून 'कर ले तू मोहब्बत’ मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहेत.'बडे अच्छे लगते है' ही मालिका बालाजी टेलिफ्लिम्सची होती. आता पुन्हा एकदा बालाजी टेलिफ्लिम्सनेच या दोघांना एकत्र आणले आहेत.