बॉलिवूडमधील धमक्यांचं सत्र काही केल्या थांबत नाहीये. रोहित शेट्टी, आयुष शर्मा, सिंगर बी प्राक यांच्यानंतर आता एका अभिनेत्रीलाही गँगस्टरकडून धमकी मिळाली आहे. 'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री हिमांशी खुराना हिला धमकीचा ईमेल आला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गँगस्टरने अभिनेत्रीकडे १० कोटींची मागणी केली आहे. मोहाली पोलीस ठाण्यात अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हिमांशीला विदेशातील गँगस्टर जीशान अख्तरने धमकीचा ईमेल केला आहे. यामध्ये त्याने अभिनेत्रीकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की "ईमेलमध्ये एक वॉईस नोट आहे. एका विदेशी गँगस्टरने ती पाठवली असल्याची शंका आहे. ज्यामध्ये त्याने १० कोटी रुपयांची मागणी केली आहे". याप्रकरणी पोलीस तपास करत असून लवकरच याबाबत कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. गँगस्टर बिश्नोईच्या गँगचा यामध्ये हात असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आयुष शर्मालाही जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. यामागेही गँगस्टर बिश्नोईची गँग होती. त्यानंतर आता अभिनेत्रीला धमकी आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
कोण आहे हिमांशी खुराना?
हिमांशी खुराना एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अनेक अल्बम साँगमध्ये तिने काम केलं आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सड्डा हक' या पंजाबी सिनेमात ती दिसली होती. 'बिग बॉस १३'मुळे हिमांशी प्रसिद्धीझोतात आली.
Web Summary : After Rohit Shetty, actress Himanshi Khurana received a threatening email from a gangster demanding ₹10 crore. Khurana filed a police complaint in Mohali. Police are investigating the threat, suspected to be from a foreign gangster, and have registered an FIR.
Web Summary : रोहित शेट्टी के बाद, अभिनेत्री हिमांशी खुराना को एक गैंगस्टर से धमकी भरा ईमेल मिला जिसमें ₹10 करोड़ की मांग की गई। खुराना ने मोहाली में पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस धमकी की जांच कर रही है, जिसके एक विदेशी गैंगस्टर से होने का संदेह है, और एफआईआर दर्ज की गई है।