Join us

"मी आणि निलेशभाऊ यांच्या एका सामान्य प्रकरणावरून.."; शरद उपाध्ये आता काय म्हणाले?

By देवेंद्र जाधव | Updated: July 4, 2025 11:30 IST

निलेश साबळेने प्रत्युत्तर दिल्यावर आता शरद उपाध्येंनी पुन्हा एकदा निलेश साबळेला उद्देशून लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाले?

सध्या मराठी मनोरंजन विश्वात डॉ. निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यातील शाब्दिक वाद चर्चेत आहे. सुरुवातीला शरद उपाध्येंनी सोशल मीडियावर पोस्ट करुन 'निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली', 'त्याने सेटवर माझ्याकडे दुर्लक्ष केलं', अशा शब्दांमध्ये निलेश साबळेवर शरद उपाध्येंनी टीका केली. त्यानंतर निलेश साबळेने सुद्धा व्हिडीओ पोस्ट करुन शरद उपाध्येंनी केलेल्या पोस्टवर स्पष्टीकरण दिलं. आता शरद उपाध्येंनी केलेली नवीन पोस्ट चर्चेत आहे.

शरद उपाध्येंची नवी पोस्ट चर्चेत

शरद उपाध्येंनी सोशल मीडियावर नवीन पोस्ट केली आहे. त्यात ते लिहितात की, "सुप्रभात मित्रमैत्रिणींनो, मी आणि नीलेशभाऊ यांच्या एका सामान्य प्रकरणावरून... आपण एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्त झालात ही फार अभिमानाची गोष्ट आहे.आपण मांडलेल्या प्रत्येक मताचा मी आदर करतो,कारण त्यातून खूप शिकायला मिळते. वेळ मिळेल तशा पोस्टस् मी लिहीनच. आपण असेच व्यक्त होत रहा." या पोस्टवर अनेकांनी "विषय संपवा आता", अशा कमेंट केल्या आहेत. शरद उपाध्येंच्या पोस्टवरुन असं दिसतंय की, या प्रकरणावर ते आणखी एखादी पोस्ट लिहितील.

निलेश साबळेने दिलं स्पष्टीकरण

निलेश साबळेने काल व्हिडीओ पोस्ट करुन तो चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वात दिसणार नाही, असं सांगितलंय. निलेशने व्हिडीओत सांगितलं की, "झी मराठीचे नॉन फिक्शन हेड रोहन राणे यांनी मला सहा महिन्यात अनेक वेळा फोन केले. चला हवा येऊ द्या सुरू करतोय. डॉक्टर तुझ्याशिवाय होणार नाही. आपण एकदा मिटींग करूयात. त्यानंतर महिन्याभरापूर्वी माझी दोन तास झी मराठीबरोबर सविस्तर मिटींग झाली."

"त्यांच्या वरळीच्या ऑफिसला आमचं सगळं बोलणं झालं होतं. माझ्या काही अडचणी होत्या, मी सध्या एक सिनेमा करतोय त्यात मी सध्या अडकलो आहे. त्याचे शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे. त्यामुळे माझ्या तारखा जुळल्या नाहीत. याशिवाय यामागे अनेक कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून मी माघार घेतो अशी विनंती मी त्यांना केली होती. "

टॅग्स :निलेश साबळेचला हवा येऊ द्या