Join us

मृण्मयी देशपांडे पाठोपाठ बहिण देखील चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 13:18 IST

बॉलीवुड असो या मराठी इंडस्ट्री सेलेब्रिटी म्हणून बहिण,भाउ, वडील, मुलगी या सर्व नात्यांची चर्चा नेहमीच रंगत असते. बॉलीवुडच्या तुलनेत ...

बॉलीवुड असो या मराठी इंडस्ट्री सेलेब्रिटी म्हणून बहिण,भाउ, वडील, मुलगी या सर्व नात्यांची चर्चा नेहमीच रंगत असते. बॉलीवुडच्या तुलनेत मराठी इंडस्ट्रीत बहिणींच्या नात्यांची नेहमीच कमतरता जाणविली. आता हिच कमतरता भरविण्यासाठी अनुराग, मामाच्या गावाला जाऊ या, पुणे व्हिया बिहार असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी मृण्मयी देशपांडेची बहिण गौतमी देशपांडे देखील मराठी चित्रपटात झळकणार आहे. बहिणीच्या पावलांवर पाऊल ठेवत गौतमी देखील रूपेरी पडदयावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतमी तशी मराठी इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाही. कारण गौतमी रूपेरी पडदयावर जरी झळकली नसली तरी तिने आपल्या अभिनयाने अनेक रंगभूमी गाजविल्या आहेत. तिच्याबद्दलचा प्लस पॉइंट म्हणावा तर ती  एक इंजिनिअर असून अभिनयाची आवड जपत नोकरी देखील करत आहे. चला, तर बॉलीवुडप्रमाणे प्रियंका-परिणीती चोप्रडा प्रमाणे काही दिवसाच मृण्मयी-गौतमी देशपांडे हे नाव चर्चेत येणार हे मात्र नक्की.