Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती रेडकरेनंतर पूजा सावंत लावणार हार्दिक जोशीच्या 'जाऊ बाई गावात' कार्यक्रमात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:50 IST

ऐशोआरामाच राहणं सोडून आलेल्या ह्या मुली गावच्या वातावरणात राहण्याच्या कसोटीवर कशा उभ्या राहणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi)च्या 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat) हा कार्यक्रम नुकताच सुरु झाला आहे.  ऐशोआरामाच राहणं सोडून आलेल्या ह्या मुली गावच्या वातावरणात राहण्याच्या कसोटीवर कशा उभ्या राहणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. या कार्यक्रमात पहिली पाहुणी क्रांती रेडकरे पाहुणी आली होती. यानंतर आता अभिनेत्री पूजा सावंत,  लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि  कोरिओग्राफर मयूर वैद्य येणार आहेत.  

'जाऊ बाई गावात' मध्ये रोज नवीन नवीन कार्य स्पर्धकांच्या भेटीस येतात. गावकऱ्यांसोबत राहता राहता काही स्पर्धक उत्सुकतेने कार्य करतात तर काहींसाठी त्या कार्यचा विचार करणे ही तारेवरची कसरत आहे. गावात रोज एक नवा पाहुणा येतो आणि मजेशीर कार्यही सोबत घेऊन येतो. पण येणाऱ्या भागात एक नाही तीन खास पाहुणे येणार आहेत.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर,  अभिनेत्री पूजा सावंत आणि कोरिओग्राफर मयूर वैद्य आले आहेत. स्पर्धकांना लावणीच  प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी मंच तयार आहे. सगळे गावकरी स्पर्धकांची लावणी बघायला येणार.  हे कार्य ठरवणार कोण ह्या गेम शो मध्ये राहणार आणि आपला सामान बांधून घरी रवाना होणार. प्रेक्षकांसाठी पूजा सावंत, मयूर वैद्य आणि सुरेखा पुणेकर यांचे खास परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत.

टॅग्स :झी मराठीहार्दिक जोशी