Join us
Daily Top 2Weekly Top 5

ह्रता दुर्गुळेनंतर ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत?, नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 07:00 IST

ह्रता दुर्गुळेनंतर लग्नाची बेडी या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार अशी चर्चा आहे.

स्टार प्रवाह वरील मालिका 'लग्नाची बेडी' चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील सिंधूच्या भूमिकाला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसतेय. सिंधूमध्ये अल्लडपणा आहे. प्रत्येक बाबतीतील तिचा खंबीरपणा, तिची कुठलीही परिस्थिती हाताळण्याची पद्धत प्रेक्षकांना भावताना दिसतेय. मालिकेत राघव आणि सिंधू यांचं लग्न अपघाताने झालं खरं पण त्यानंतर त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर कालांतराने प्रेमात आहे. मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे.एकत्र आलेल्या सिंधू आणि राघव मध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार आहे.

मालिकेत सिंधूची भूमिका सायली देवधर साकरतेय. या आधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलेले आहे. तर राघवची भूमिका अभिनेता संकेत पाठक याने साकारली आहे. संकेत पाठक देखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. या मालिकेतील मधु हे पात्रदेखील लोकप्रिय आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री रेवती लेले साकारते आहे. ‘स्वामिनी’मध्ये तिनं रमाची भूमिका साकारली होती. 

रेवती लेले लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं कळतंय. रेवतीचा होणार नवरादेखील अभिनेता आहे. 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदिश वैद्यसोबत ती नात्यात आहे. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम करणारा आदिश सोशल मीडियावर कायमच चर्चेत येत असतो. गेल्या कित्येक काळापासून ही जोडी एकमेकांना डेट करत असून दोघांच्या कुटुंबियांचीदेखील या नात्याला परवानगी आहे. आदिश 'रात्रीस खेळ चाले', 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमांमध्ये झळकला आहे. तसंच तो हिंदी कलाविश्वात जास्त सक्रीय आहे. आदिश आणि रेवती  कधी लग्न करणार याबाबत काही माहिती मिळाली नाही. 

सोशल मीडियावर दोघे नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते. सध्या आदिश सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत काम करतोय. 

 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार