बॉलिवूड अभिनेता एजाज खान त्याच्या हाऊस अरेस्ट शोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी एजाज खान आणि शोच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता एका महिलेने अभिनेत्याविरोधात पोलिसांत धाव घेत एजाजवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
एजाज खानने सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप ३० वर्षीय महिलेने केला आहे. अभिनेत्याने शारीरिक शोषण केल्याचं महिलेचं म्हणणं आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून एजाज खानला चौकशीला सामोरं जावं लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, हाऊस अरेस्ट शोमधली आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा शो बंद करण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकारानंतर उल्लू अॅपकडून माफी मागण्यात आली आहे. तसंच हाउस अरेस्ट शोचे एपिसोडही डिलीट केले गेले आहेत.