गोव्यातही लॉकडाउन जाहीर केल्यानंतर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचे शूटिंग दुसऱ्या राज्यात हलवण्यात आले.
गोव्यानंतर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचं शूटिंग होतंय या राज्यात, नव्या सेटचा व्हिडीओ आला समोर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर बऱ्याचशा मालिकांचे शूटिंग इतर राज्यात होते आहे. काही मालिका शूटिंगसाठी गोव्यात गेले होते. मात्र तिथेही लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरव ते गुजरात, दमण आणि सिल्व्हासा या ठिकाणी हलविण्यात आले. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे शूटिंग आता गुजरातमध्ये होते आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे शूटिंग गोव्यात सुरू होते. मात्र तिथेही कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर मालिकेचे शूटिंग सिल्व्हासा येथे हलविण्यात आले आहे.
या सेटवरील व्हिडीओ नुकताच समोर आला. यात सेटवर शूटिंगसाठी सुरू असलेली तयारी देखील पहायला मिळत आहे. येत्या काही दिवसातच मालिकेतील हा बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत नुकतेच गौरीचा मेकओव्हर पहायला मिळाला. हा मेकओव्हरसाठी जयदीपनेच पुढाकार घेतला होता. गौरीला जयदीपसोबत एका पार्टीमध्ये जातात आणि त्यासाठी तो गौरीला तयार करतो. पार्टीत गौरी आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. मात्र या पार्टीत गौरीला एक जण डान्स साठी जबरदस्ती करतो. हे जयदीपला आवडत नाही आणि तो रागाने गौरीला घेऊन तिथून निघून जातो.
गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रूपात पाहून फारच भारावून गेली होती. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लुक डिझाईन केला होता. हा सीन करताना सेटवरही नवा उत्साह संचारला होता. जयदीप गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. हेच प्रेम मालिकेतल्या या नव्या वळणाला सुद्धा मिळेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे.